मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

दिल्ली जळतेय.. जबाबदार कोण? - हर्षल जाधव


महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपला देश फिरत असताना, त्यांच्या पत्नी दिल्ली मधील आदर्शवत असणाऱ्या शाळा पाहण्याचे नियोजित असताना दिल्ली मध्ये caa आणि nrc बद्दल विरोधक आणि समर्थक यांच्यात जोरदार संघर्ष घडताना दिसत आहे. सोबतच इंडियन आर्मी च्या ड्रेसकोड मध्ये काही लोक सशस्त्र फिरताना दिसत आहेत त्याबद्दल इंडियन आर्मी च्या ट्विटर handel वरून याची माहिती दिली जाते..
विरोध करणारे आणि समर्थन करणारे दोन्ही बाजूने दगडफेक, जाळपोळ करत आहेत. 
शाहरुख नावाचा एक इसम यामध्ये खुलेआम पिस्तुल घेऊन फिरताना दिसत आहे. (यापूर्वी बंदूकधारी गोपाळ देखील पाहिला आहे) हिंसाचारात एक वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर आणि 3 सामान्य व्यक्ती दगावल्याच्या बातम्या येत आहेत. एकूण आकडा आता 7 वर गेला आहे.
मोदी, ट्रम्प साहेबांना प्रेमाचे प्रतीक असणारा ताजमहल दाखवत असताना दिल्ली मात्र द्वेषाने, रागाने, सूडाच्या भावनेने जळत आहे. हा राग, द्वेष, असूया ही दोन धर्मामधील असल्याचे चित्र पुन्हा पुन्हा इंडिरेक्टली दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

या स्थितीला सांगण्याचा भाग एवढा आहे की, 
एक शाहरुख म्हणजे देशातील संपूर्ण मुस्लिम समाज नव्हे आणि कायद्याचे समर्थन करनारे मूठभर हिंदू म्हणजे संपूर्ण देशातील हिंदू नव्हेत. अश्यावेळी महत्वाची भूमिका वठवण्याचे काम करायला हवं ते आपल्या नेत्यांनी... (दिल्लीमध्ये law and order ची जबाबदारी केंद्र सरकारची असते.. जे की गृहमंत्र्याच्या अखत्यारीत येते..) गृहमंत्री असोत किंवा पंतप्रधान.. आपला इगो बाजूला ठेऊन त्यांनी या कायद्याला विरोध करणाऱ्या लोकांशी संवाद साधायला हवा.. यासाठी स्वतःहुन त्यांनी पुढे यायला हवं.. फक्त गांधी प्रतिमेपुढे हात जोडून आणि चरखा कसा चालवावा याबद्दल साबरमती मध्ये जाऊन मार्गदर्शन केल्याने गांधी होता येत नाही. देश स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद साजरा करत होता तेंव्हा गांधी बा नोआखोली सारख्या ठिकाणी हिंदू - मुस्लिम दंगली थोपविण्यासाठी स्वतः गेला होता हे गांधींना जगभर मांडत फिरणाऱ्याना समजायला हवं..
शेवटी
दिल्ली दिल्लीच रहावी. गुजरात पॅटर्न लागू करून गोद्रा व्हायला नको कारण 
राहत इंदौरी म्हणतात तस - 'आग का क्या है पल दो पल में लगती है, 
बुझाते बुझाते एक ज़माना लगता है'

हर्षल जाधव, 9637351400
25/02/2020
Posted on by हर्षल जाधव | No comments

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा