रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

आपल्या गावात दारू बंदी झाली पण !

आपल्या गावात दारू बंदी झाली पण...!

- हर्षल जाधव कसबा तारळे 9637351400

प्रथमता आपल्या गावातील सर्वच सूज्ञ गावकर्याचे व त्यांनाच सोबत घेवुन गावात दारू बंदी लागू करणार्या ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे अभिनंदन....

आपल्या राज्यातील सर्वात जास्त दारू बंदी असणारे गावे ही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहेत आणि याच गावांपैकी आपलं एक गाव आहे आणि त्या गावचा मी ग्रामस्थ असल्याचा मला खूप अभिमान ही आहे..

2003 साली आपल्या गावात प्रथमता दारू बंदी साठी मतदान घेण्यात आले होते मात्र येथल्या स्त्री वर्गात असलेल्या जागरुकतेचा अभाव यामुळे ही चळवळ बारगळली..मात्र आज तो सोनीयाचा दिवस उगवला व सामान्य जनमानसाच्या सोबतीला ईथली राजकीय शक्ति  एकवटली व हा निर्णय पार पडला...
आपल्या गावात अनेकदा दारू पिवुन बायकोला मारणारा दारूडा नवरा..अर्वाच शिव्या हसडनारा बाप..किंवा दारू पिवून भावालाच मारणारा भाऊ आपण प्रत्येकाने थोड्या बहूत फरकाने अनुभवलाच आहे...अनेक भगिनींचा संसार या दारूमुळे उध्वस्त होताना आपण पाहिलंय..
या सर्वानाच आता चाप बसणार आहे..

शेवटी समाज हा परिवर्तनशील असतो याचेच हे द्योतक म्हणावे लागेल पण हा विजय साजरा करत असतानाच त्या विजया सोबत काही आपल्याही  जबाबदारी येतात हे लक्षात घ्या..
दारूबंदी हवीच. ती यापूर्वीच आपल्या गावात व्हायला हवी होती असो देर आये दूरूस्त आये..
दारूबंदीमुळे दारू सहजी उपलब्ध होत नाही आणि निदान काही लोक तरी कायद्याच्या भीतीपोटी तिच्यापासून दूर राहतात. या सगळ्या गोष्टी खर्‍या आहेत. परंतु महाराष्ट्रात वर्धा गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यात दारूबंदी आहे,
ती खरोखर लागू आहे का याची पाहणी झाली पाहिजे. कारण दारूबंदी करायची असेल तर ती पूर्ण देशभर केली पाहिजे. एका विशिष्ट राज्यात आणि एका विशिष्ट जिल्ह्यात गावातच केली तर ती करून न केल्यासारखी होते.
हेच पहा ना महाराष्ट्रातच गुटखा बंदी आहे परंतु महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमध्ये ती बंदी नाही. त्यामुळे त्या राज्यातून महाराष्ट्रात सर्रास गुटखा आणला जातो आणि त्यामुळे महाराष्ट्रातली गुटखा बंदी हा चेष्टेचा विषय झाला आहे.

दारूचे तसेच आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे पण भंडारा जिल्ह्यात नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातले शेवटचे गाव ओलांडून जाऊन भंडार्‍यात दारू प्यायला बरेच लोक गर्दी करतात आणि भंडार्‍यात दारू पिऊन चंद्रपुरात येतात. १९९५ साली आंध्र प्रदेशामध्ये अशीच दारूबंदी लागू करण्यात आली होती. ती दारूबंदी अशा सीमेमुळेच निरर्थक ठरली.
आपल्या गावाचे तसे नको व्हायला..

मुळात दारू बंदी करने हा या समस्येवरील खरा उपाय नाही तर दारूमुक्त समाज निर्माण करने हा आपल्या समोरील सर्वात मोठा संघर्ष आहे तो आपण येणाऱ्या काळात यशस्वी करायलाच हवा कारण दारू बंदी केल्याने आपल्या गावात दारू मिळायची बंद होईल पण जवळच्या ईतर गावात सहज उपलब्ध होणाऱ्या दारूचे काय?
आपल्या गावात ज्या प्रकारे ही दारू बंदी घडून आली तशीच आपल्या आजुबाजुला असणाऱ्या लहान गावांत ही व्हायला हवी यांसाठी प्रबोधनाचा मार्ग आपल्या गावातील तरुण मंडळानी स्वीकारायला हवा..त्याच सोबत आपल्या गावाचा आदर्श बाजूच्या गावांनी घेवुन तेथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यानी पुढाकार घेवून दारू बंदी करायला हवी..ग्राम स्वच्छता अभियानाचा गौरवाशाली ईतिहास आपण घडवलाच होता आता वेळ आलेली आहे ती या दारूबंदी आणि ईतर व्यसनांपासून आपल्या समाजाला स्वातंत्र्य करण्याची...कारण व्यसनमुक्त समाज हाच एखाद्या राष्ट्राला महासत्ता बनवू शकतो..

विचार तर कराल !

- तुमचाच
सर्वांच्याच स्वप्नातील समाज घडवू पाहणारा एक विवेकसाथी
हर्षल जाधव
9637351400

Posted on by हर्षल जाधव | No comments

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा