सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

गुलाबी नोटेचे स्वप्न पाहत बँके बाहेरच उभी असलेली एक अडाणी आजीबाई..

गुलाबी नोटेचे स्वप्न पाहत बँके बाहेरच उभी असलेली एक अडाणी आजीबाई..

"एवढी गर्दी कमी येवू देत मग मग मला पैसे मिळतील" असा समज करून ती बाहेरच उभी होती...सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या...रांग हनुमानाच्या शेपटी सारखी वाढतच होती...
न राहवून मीच तिची चौकशी केली..तिला तिच्या खात्यातील पैसे काढायचे होते पण बँकेतील गर्दी पाहून तीला काय करायचं उमजत नव्हत..शेवटी मीच तिला पैसे काढायची स्लिप भरून दिली आणि महिलांसाठीच्या रांगेत उभे राहायला सांगितलं...

महिलांची रांग छोटी होती..माझ्या अगोदर पैसे घेवुन ती मोकळी पण झाली...दरवाजाकडे जावु लागली..बँकेतून बाहेर पडते तोच तिच्या काहीतरी लक्षात आलं...मागं फिरली..रांगेत मी अजून उभाच होतो..माझ्या जवळ आली आणि मोठ्या समाधानाने "येतो पोरा " म्हणत निघून गेली...

टीव्ही वर नुसत्या शहरातील बँकेत जमणार्या गर्दीचं चित्रीकरण दाखवलं जातंय..आमच्या खेड्यातील या अडाणी म्हातारा- म्हातारिंची स्वः कष्टातून जमवलेल्या पैस्यासाठीची धडपड कोणालाच कशी दिसत नाही...!

काळाच्या पटलावरील एक एक दिवसांनी पुसट होत जाणाऱ्या या ठिपक्यांनी बँकेचे व्यवहार अचूक पार पाडावेत हि अपेक्षाच मुळात चुकीची आहे पण आशाळभूत नजरेने त्यांनी आमच्या सारख्या एखाद्या तरुण तुर्काची मदत मागावी आणि आम्ही ती करू नये हे मात्र चुकीचं आहे...

बँकेत येवूनहि बँकेत न आलेल्या अनेक वृध्द लोकांना आज आपल्या सारख्या शिकलेल्या तरुणांची गरज आहे....मी मदत केली तुम्हीही करा..
- हर्षल जाधव
दिनांक :- 12 नोव्हेंबर 2016

Posted on by हर्षल जाधव | No comments

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

यावर्षी ची दिवाळी..

यावर्षी ची दिवाळी खूप खास होती..
नोकरीचा पहिला पगार असल्याने दिवाळीत दिवाळी होती.
परंपरे नुसार पहिल्या पगारात घरातील सर्व मेंबर ना कपड़े घेतले...तर कांहींना गिफ्ट..

व यावेळी सर्वात मोठी दिवाळी भेट म्हणजे आमचे ऊर्जा केंद्र,विषमतेचे निर्मूलन करून समतेची विचारधारा बळकट करण्याचे काम ज्यांच्या लेखणीतून आणि विचारांतून नेहमी होत असते असे आ.ह साळूखे सरांची भेट...

यापूर्वी सर आणि मी विविध कार्यक्रमात अनेकदा भेटलो आहोत पण हि भेट काही औरच होती..'लोकायत' मध्ये झालेल्या या भेटीत त्यांच्याशी बोलताना कधी वेळ पुढे सरकला कळले देखील नाही..चळवळ,त्यातून भेटणारी लोकं,वैयक्तिक आयुष्य,लिहिण्याची कला,आपले आरोग्य, त्याच्या सवयी यांसारख्या विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली..वेळ पाळण्याविषयी सर बोलत असतानाच आमच्या हि लक्षात आले की आपण हि आता वेळ पाळून येथून निघायला हवे..शेवटी त्यांना त्यांचे अपूर्ण राहिलेले पुस्तक असुरायन पूर्ण करण्याची विनंती केली व आम्ही निघालो..
दरवर्षी प्रमाणे यावर्षीहि मी दिवाळी च्या दिवशी आमच्या घराच्या अंगणात रांगोळी काढली..वर्षातील काही महत्वाच्या दिवशी मी हि संधी सोडत नाही...ती सर्वांना आवडली..
यंदाहि थोड्या बहुत फरकाने फटाकेमुक्त दिवाळी(100% म्हणता येत नाही) साजरी करत असताना शिल्लक पैश्यातून खूप सारी पुस्तके घेतली...
व पुरोगामी वाचन चळवळ, कोल्हापूरचे वतीने दिनांक 1 नोव्हेंबर ला जिल्हा परिषद मराठी शाळा कोनवडे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथे वैज्ञानिक जाणीव जागृती आणि व्यक्तीमत्वविकास शिबिराचे उद्घाटन झाले. ..
यावेळी पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमा अंतर्गत मी व Rajvaibhav दोघांनि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांला अनुसरून मांडणी करत असताना विविध चमत्कार सादर केले व त्याचे योग्य स्पष्टीकरणहि दिले..
प्रेक्षण वर्ग 1 ली ते 7 वीचे विद्यार्थी असल्याने त्यांना त्यांच्या पातळीवर जावून प्रबोधनाचे डोस देने तसे अवघडच पण शक्य होईल त्या पदध्तीने विविध मार्गांचा वापर करून कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला...सर्वच मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला...
अश्या प्रकारे यंदाची दिवाळी या विविध उपक्रमानी colourful ठरली....

Posted on by हर्षल जाधव | No comments