सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

गुलाबी नोटेचे स्वप्न पाहत बँके बाहेरच उभी असलेली एक अडाणी आजीबाई..

गुलाबी नोटेचे स्वप्न पाहत बँके बाहेरच उभी असलेली एक अडाणी आजीबाई..

"एवढी गर्दी कमी येवू देत मग मग मला पैसे मिळतील" असा समज करून ती बाहेरच उभी होती...सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या...रांग हनुमानाच्या शेपटी सारखी वाढतच होती...
न राहवून मीच तिची चौकशी केली..तिला तिच्या खात्यातील पैसे काढायचे होते पण बँकेतील गर्दी पाहून तीला काय करायचं उमजत नव्हत..शेवटी मीच तिला पैसे काढायची स्लिप भरून दिली आणि महिलांसाठीच्या रांगेत उभे राहायला सांगितलं...

महिलांची रांग छोटी होती..माझ्या अगोदर पैसे घेवुन ती मोकळी पण झाली...दरवाजाकडे जावु लागली..बँकेतून बाहेर पडते तोच तिच्या काहीतरी लक्षात आलं...मागं फिरली..रांगेत मी अजून उभाच होतो..माझ्या जवळ आली आणि मोठ्या समाधानाने "येतो पोरा " म्हणत निघून गेली...

टीव्ही वर नुसत्या शहरातील बँकेत जमणार्या गर्दीचं चित्रीकरण दाखवलं जातंय..आमच्या खेड्यातील या अडाणी म्हातारा- म्हातारिंची स्वः कष्टातून जमवलेल्या पैस्यासाठीची धडपड कोणालाच कशी दिसत नाही...!

काळाच्या पटलावरील एक एक दिवसांनी पुसट होत जाणाऱ्या या ठिपक्यांनी बँकेचे व्यवहार अचूक पार पाडावेत हि अपेक्षाच मुळात चुकीची आहे पण आशाळभूत नजरेने त्यांनी आमच्या सारख्या एखाद्या तरुण तुर्काची मदत मागावी आणि आम्ही ती करू नये हे मात्र चुकीचं आहे...

बँकेत येवूनहि बँकेत न आलेल्या अनेक वृध्द लोकांना आज आपल्या सारख्या शिकलेल्या तरुणांची गरज आहे....मी मदत केली तुम्हीही करा..
- हर्षल जाधव
दिनांक :- 12 नोव्हेंबर 2016

Posted on by हर्षल जाधव | No comments

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा