रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

आपल्या गावात दारू बंदी झाली पण !

आपल्या गावात दारू बंदी झाली पण...!

- हर्षल जाधव कसबा तारळे 9637351400

प्रथमता आपल्या गावातील सर्वच सूज्ञ गावकर्याचे व त्यांनाच सोबत घेवुन गावात दारू बंदी लागू करणार्या ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे अभिनंदन....

आपल्या राज्यातील सर्वात जास्त दारू बंदी असणारे गावे ही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहेत आणि याच गावांपैकी आपलं एक गाव आहे आणि त्या गावचा मी ग्रामस्थ असल्याचा मला खूप अभिमान ही आहे..

2003 साली आपल्या गावात प्रथमता दारू बंदी साठी मतदान घेण्यात आले होते मात्र येथल्या स्त्री वर्गात असलेल्या जागरुकतेचा अभाव यामुळे ही चळवळ बारगळली..मात्र आज तो सोनीयाचा दिवस उगवला व सामान्य जनमानसाच्या सोबतीला ईथली राजकीय शक्ति  एकवटली व हा निर्णय पार पडला...
आपल्या गावात अनेकदा दारू पिवुन बायकोला मारणारा दारूडा नवरा..अर्वाच शिव्या हसडनारा बाप..किंवा दारू पिवून भावालाच मारणारा भाऊ आपण प्रत्येकाने थोड्या बहूत फरकाने अनुभवलाच आहे...अनेक भगिनींचा संसार या दारूमुळे उध्वस्त होताना आपण पाहिलंय..
या सर्वानाच आता चाप बसणार आहे..

शेवटी समाज हा परिवर्तनशील असतो याचेच हे द्योतक म्हणावे लागेल पण हा विजय साजरा करत असतानाच त्या विजया सोबत काही आपल्याही  जबाबदारी येतात हे लक्षात घ्या..
दारूबंदी हवीच. ती यापूर्वीच आपल्या गावात व्हायला हवी होती असो देर आये दूरूस्त आये..
दारूबंदीमुळे दारू सहजी उपलब्ध होत नाही आणि निदान काही लोक तरी कायद्याच्या भीतीपोटी तिच्यापासून दूर राहतात. या सगळ्या गोष्टी खर्‍या आहेत. परंतु महाराष्ट्रात वर्धा गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यात दारूबंदी आहे,
ती खरोखर लागू आहे का याची पाहणी झाली पाहिजे. कारण दारूबंदी करायची असेल तर ती पूर्ण देशभर केली पाहिजे. एका विशिष्ट राज्यात आणि एका विशिष्ट जिल्ह्यात गावातच केली तर ती करून न केल्यासारखी होते.
हेच पहा ना महाराष्ट्रातच गुटखा बंदी आहे परंतु महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमध्ये ती बंदी नाही. त्यामुळे त्या राज्यातून महाराष्ट्रात सर्रास गुटखा आणला जातो आणि त्यामुळे महाराष्ट्रातली गुटखा बंदी हा चेष्टेचा विषय झाला आहे.

दारूचे तसेच आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे पण भंडारा जिल्ह्यात नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातले शेवटचे गाव ओलांडून जाऊन भंडार्‍यात दारू प्यायला बरेच लोक गर्दी करतात आणि भंडार्‍यात दारू पिऊन चंद्रपुरात येतात. १९९५ साली आंध्र प्रदेशामध्ये अशीच दारूबंदी लागू करण्यात आली होती. ती दारूबंदी अशा सीमेमुळेच निरर्थक ठरली.
आपल्या गावाचे तसे नको व्हायला..

मुळात दारू बंदी करने हा या समस्येवरील खरा उपाय नाही तर दारूमुक्त समाज निर्माण करने हा आपल्या समोरील सर्वात मोठा संघर्ष आहे तो आपण येणाऱ्या काळात यशस्वी करायलाच हवा कारण दारू बंदी केल्याने आपल्या गावात दारू मिळायची बंद होईल पण जवळच्या ईतर गावात सहज उपलब्ध होणाऱ्या दारूचे काय?
आपल्या गावात ज्या प्रकारे ही दारू बंदी घडून आली तशीच आपल्या आजुबाजुला असणाऱ्या लहान गावांत ही व्हायला हवी यांसाठी प्रबोधनाचा मार्ग आपल्या गावातील तरुण मंडळानी स्वीकारायला हवा..त्याच सोबत आपल्या गावाचा आदर्श बाजूच्या गावांनी घेवुन तेथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यानी पुढाकार घेवून दारू बंदी करायला हवी..ग्राम स्वच्छता अभियानाचा गौरवाशाली ईतिहास आपण घडवलाच होता आता वेळ आलेली आहे ती या दारूबंदी आणि ईतर व्यसनांपासून आपल्या समाजाला स्वातंत्र्य करण्याची...कारण व्यसनमुक्त समाज हाच एखाद्या राष्ट्राला महासत्ता बनवू शकतो..

विचार तर कराल !

- तुमचाच
सर्वांच्याच स्वप्नातील समाज घडवू पाहणारा एक विवेकसाथी
हर्षल जाधव
9637351400

Posted on by हर्षल जाधव | No comments

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

"कॉम्रेड अविका सपना पुरा कौन करेगा ?"

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा तरुण मुलगा अवी अचानक आणि धक्कदायक पद्धतीने मरण पावला . चळवळीत आलेला , दोन मुलांचा पिता असणारा व आणि स्वतःच्या वडिलांच्या कम्युनिस्ट चळवळीची धुरा पेलायला उभा राहिलेला अवी अचानक या जगातून नाहीसा झाला. कोल्हापूर मधीलच हजारो लोकांना हा धक्का अनावर , आरपार होता पण अविच्या अंतयात्रेत त्याला कॉम्रेड म्हणून पहिला लाल सलाम करून देणारे अवीचे वडील म्हणजेच कॉम्रेड पानसरेच होते .
"कॉम्रेड अविका सपना पुरा कौन करेगा ?" हा सवाल त्यांनी समस्त रडणार्या , आक्रोशात बुडलेल्या अक्षरशः दहा हजारापेक्षा जास्त संख्येने उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाला विचारला , तेंव्हा जनसमुदायाकडून एकमुखाने आवाज आला "हम करेंगे हम करेंगे ".. ..

रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

आता आपली पाळी... यांची साथ आता आपण नाही सोडायची...


आता आपली पाळी... यांची साथ आता आपण नाही सोडायची... 

मराठा मुख मोर्चा यशस्वी करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन... 
या मोर्च्यात अनेक समाज घटकांनी आपला सहभाग, पाठींबा दर्शवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे..
यातीलव्ह एक संवेदनशील घटक म्हणजे पुरोगामी विचाराचे लोक.. हि लोकं तशी अल्पसंख्याकच...
शाहू फुले आंबेडकर जगणारी हि माणसे..
नुसते भाषणातच नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्यात हि हि लोक कमालीची महामानवाचे विचार जगणारी हि लोक.. 
स्वातंत्र्य समता बंधुता हि तत्वे चिरंतन टिकावीत म्हणून सदैव प्रस्थापितांशी झुंज देणारी हि लोक
अंधश्रद्धा , जातीयता , कर्मकांड ,, अन्याय अत्याचार यांना सदैव विरोध करणारी हि लोक...
यांच्या या प्रवाहाच्या विरुद्ध घेऊन जाणाऱ्या विचारांमुळे हे नेहमीच बहुसंख्यांकांच्या रोषाचे धनी होत असतात
त्यात सध्या जातीच्या आधारेच मोर्चे निघत आहेत.. जाती अंताची स्वप्ने पाहणारा हा पुरोगामी वर्ग या मोर्च्या पासून स्वतःला कसा वेगळा ठेवू शकतो...
जात हीच अंधश्रद्धा असा म्हणणारा , नवविचारांची समाजात रुजवणूक करणारा हा वर्ग
या मोर्च्यातहि सामील होऊन हा मोर्चा यशस्वी पार पडावा म्हणून झटत असताना आपण सर्वानी पाहिला म्हणूनच
मित्रानो आता आपलीहि जबाबदारी वाढली आहे.. आपल्या या युद्धाच्या काळात हि लोक आपली तत्वे बाजूला सारून
आपल्यात सामील झाली. आता यापुढे आपणही याची साथ सोडायची नाही. शाहू फुले आंबेडकराचे
स्वप्न साकार करू इच्छिणाऱ्या या लोकांच्या विचारांना आपण आपल्या कृतीतून साथ द्यायची.. अंधश्रद्धा , भोंदूगिरी ,जातीयता ,धर्मांधता संपवन्यासाठी आपणही आता यांच्या व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेतले पाहिजे.. स्वतः पुरोगामी विचार जोपासून आपल्या घरामध्ये या विचारांचे अधिष्ठान निर्माण करून तसा संपूर्ण समाज घडविण्याच्या त्यांच्या या स्वप्नात आपण देखील सामील झाले पाहिजे..
दाभोलकर पानसरे कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात आपली व्यवस्था अजूनही यशस्वी नाही झाली त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी शासनाला
मोर्च्या उपोषणाच्या माध्यमातून जाब विचारला पाहिजे.. ती आता आपलीही नैतिक जबाबदारी झाली पाहिजे..
आंतरजातीय विवाहाला आपणही प्रोत्साहन दिले पाहिजे.. प्रोत्साहन देता येत नसल्यास निदान विरोध तरी नको करायला..
कोणत्याही व्यक्तीच्या (तो कोणत्याही जाती व धर्माचा असो ) त्याच्या जीवन जगण्याच्या मूलभूत हक्काकवर गदा येणार नाही , त्याचे स्वातंत्र्य विचार करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही यासाठी वैयक्तिक आपण प्रयत्न करायला हवेत.. तेंव्हाच आपल्या आजूबाजूचा समाज खर्या अर्थाने पुढारलेला असेल .. यासाठी इथून पुढील वाटचालीत आपन या पुरोगामी विचाराच्या मित्रांना आपली साथ नक्कीच देऊ ..
एकमेकांच्या साथीनेच स्वातंत्र्य समता बंधुता यांवर विश्वास ठेवणारा समाज आपण घडवू
आणि त्यातूनच उद्याचा भारत घडून येईल याची मला पूर्ण खात्री आहे..
आपलाच परिवर्तनाच्या वाटेवरील एक मराठा
हर्षल जाधव
९६३७३५१४००

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

जर...तर

स्वच्छ व कडक ईस्त्रीचे कपड़े परिधान केलेले आमदार 
जर
त्यांच्या कपड्यांईतके स्वच्छ असते 
तर
या देशामधील गरीब व श्रीमंत यांतील 
अंतर नक्कीच कमी झाले असते.


सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६